Bhimashankar Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Bhimashankar Sugar Mill : भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन

दत्तात्रयनगर, (पारगाव ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२३-२४ च्या पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : दत्तात्रयनगर, (पारगाव ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२३-२४ च्या पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मिल रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करून सुरवात करण्यात आली.

कारखान्याचे अध्यक्ष श्री. बेंडे म्हणाले, की कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरिता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

गाळप हंगाम कमी ऊस उपलब्धतेचा असल्याने ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचारी यांनी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळितास द्यावा, असेही ते म्हणाले.

मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, बाबासाहेब खालकर, दादा पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे,

सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT