Cotton Bollworm  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Bollworm : बोंड अळीमुळे वाढली शेतकऱ्यांची चिंता

Cotton Pest Control : अतिवृष्टीच्या तावडीतून कसेबसे सावरल्यानंतर आता जिल्ह्यात बोंड अळीचे अस्तित्व दिसायला लागले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : अतिवृष्टीच्या तावडीतून कसेबसे सावरल्यानंतर आता जिल्ह्यात बोंड अळीचे अस्तित्व दिसायला लागले आहे. बाभूळगाव व दारव्हा तालुक्यांसह इतर तालुक्यांत कपाशीवर बोंड अळी आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता डोमकळ्या शोधून नष्ट करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

बोंड अळीने चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात मोठा धुमाकूळ घातला होता. बोंड अळीच्या प्रकोपाने संपूर्ण शेत नांगरण्याची वेळ शेतकऱ्यांवर यापूर्वी येऊन ठेपली होती. बोंड अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभाग व प्रशासनाने युद्धस्तरावर काम केले. त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या वर्षापर्यंत बोंड अळीचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. यंदा अतिवृष्टीत शेत व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कापूस, सोयाबीन, तूर ही पिके वाहून गेलीत. पुरात वाचलेल्या पिकांवरही वेगवेगळे कीड-रोग आले आहेत. त्यातून शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. अशातच आता कपाशीच्या बहरलेल्या पिकावर बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळी आढळून आली आहे. बोंडअळी काही भागांत दिसून आल्याने अळींचा प्रादुर्भाव वाढणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

यंदा काही भागांतच कमी प्रमाणात अळी आढळून आली आहे. कापसाचे पीक फुले पातीवर असताना अळीचा शिरकाव दिसत आहे. बाभूळगाव तालुक्यानंतर आता दारव्हा तालुक्यातील काही भागांत अळीचे अस्तित्व दिसले आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

यंदा जवळपास साडेचार लाख हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड झाली आहे. अतिवृष्टी व पुराने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. अतिपावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. अशातच गुलाबी बोंड अळी दिसत असल्याने चांगल्या उत्पादनाच्या आशेत असलेले शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

बाभूळगाव तालुक्यातील पिकांची पाहणी

बाभूळगाव तालुक्यातील काही भागांत बोंड अळी आढळल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना मिळाली. त्यांनी विलंब न करता प्रत्यक्ष क्षेत्राची व अनेक शेतांत पाहणी करीत शेतातही भेटी दिल्या. बोंड अळी आढळून आलेल्या ठिकाणी व इतर शेतकऱ्यांनाही प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT