Bio Fuel Agrowon
ताज्या बातम्या

Bio Fuel : महानिर्मितीतर्फे जैव इंधन वापराबाबत उद्या कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ही राज्य शासनाच्या मालकीची कंपनी असून स्थापित क्षमतेच्या बाबतीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन पाठोपाठ वीजनिर्मिती क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्यावतीने (महानिर्मिती) (Mahanirmiti) ‘‘औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बायोमास पॅलेटचा (Biomass Palet) प्रभावी वापर’’ या विषयावर आधारित उद्या मंगळवारी (ता. २८) पुण्यातील हॉटेल नोवोटेल येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महाझेनकोचे चेअरमन डॉ. पी. अन्बलगण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे.

यावेळी महानिर्मिती संचालक सुदीप नाग, संजय मारूडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, दिवाकर गोखले, कार्यकारी संचालक राजेश पाटील, डॉ. नितीन वाघ, पंकज सपाटे, पंकज नागदेवते हे उपस्थित राहणार असून कार्यशाळेत शेतकरी व लघु, मध्यम उद्योजक यांचा प्रातिनिधिक सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ही राज्य शासनाच्या मालकीची कंपनी असून स्थापित क्षमतेच्या बाबतीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन पाठोपाठ वीजनिर्मिती क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी आहे.

जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचे सूचनेनुसार ‘‘मिशन समर्थ’’ अंतर्गत औष्णिक वीज केंद्रात कोळश्यासोबत किमान ५ टक्के इतक्या प्रमाणात बायोमास पेलेट इंधनाचा मिश्रित वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन केले असून यामध्ये प्रामुख्याने बायोमास जैव इंधन वापर या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जैव इंधन निर्मिती करणारे लघु,मध्यम उद्योजक, जैव इंधनकरिता कच्चा माल पुरवठा करणारे शेतकरी यांचेकरिता मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जाणार असून या विषयाशी संबंधित माहिती देणारे विविध प्रदर्शनी स्टॉल्स देखील असणार आहेत.

जैव इंधन तंत्रज्ञान, संधी, आव्हाने, संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धता इत्यादी बाबींवर या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये केवळ निमंत्रित सदस्यांना सहभागी होता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT