KCR Agrowon
ताज्या बातम्या

Shetkari Sanghatana : शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भारत राष्ट्र समितीत प्रवेश

भारत राष्ट्र समिती हे शेतकऱ्यांच्या उत्थानासाठीचे राजकीय आंदोलन आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद येथे केले.

Team Agrowon

Hyderabad News भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtr Samiti) हे शेतकऱ्यांच्या उत्थानासाठीचे राजकीय आंदोलन आहे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी हैदराबाद येथे केले.

बंजारा हिल्स परिसरातील भारत राष्ट्र समितीच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात या वेळी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू, उपाध्यक्ष कैलास तवार, मराठवाडा विभाग प्रमुख रामजीवन बोंदर, महिला आघाडीच्या सुवर्णा काटे आदींसह कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते.

या वेळी तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव, मंत्री सत्यवथी राठोड, बी. बी. पाटील, आमदार जीवन रेड्डी, आमदार बालका सुमन, किसान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुनाम चुडणी, बीआरएस किसान सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माणिक कदम आदींसह मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राव म्हणाले, की शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी रस्त्यावरच्या आंदोलनापेक्षा राजकीय आंदोलन करणे गरजेचे आहे. भारत राष्ट्र समिती हे शेतकरी हिताचे धोरण ठरविण्यासाठीचे राजकीय आंदोलन आहे. या माध्यमातून किसान सरकारची स्थापना करून शेतकरी हिताचे धोरण देशभर राबविणार.

तेलंगणा राज्यात गेल्या नऊ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या शेती योजनांची माहिती त्यांनी या वेळी देऊन अशाच योजना भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून देशभर राबविणार असल्याचे राव म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT