Grape  Agrowon
ताज्या बातम्या

द्राक्ष उत्पादक महिलेची अकरा लाखांची फसवणूक

धनगरवाडी (ता. राहाता) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी महिला व तिच्या काकाची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एकास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

नगर : धनगरवाडी (ता. राहाता) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी महिला व तिच्या काकाची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एकास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धनगरवाडी येथील शेतकरी महिला ज्योती रामभाऊ लोखंडे व त्यांचे काका बाबूराव विठ्ठल शेळके यांची वाकडी शिवारात द्राक्ष बाग आहे. त्यांच्या बागेतील द्राक्ष पिकाचा २० लाख २० हजार रुपयांना अमोल जोंधळे, प्रशांत जोंधळे, प्रमोद जोंधळे, (सर्व रा. कोंची, ता. संगमनेर) यांच्याशी हा सौदा झाला होता. या सौद्यातील ठरलेल्या रकमेपैकी ९ लाख २० हजार रुपये ज्योती लोखंडे व बाबूराव शेळके यांना धनादेशाद्वारे दिले. उर्वरित ११ लाख रुपये नंतर देतो असे सांगून त्यांच्या बागेतील द्राक्षे काढून नेले. सदरची रकम वेळोवेळी मागूनही दिली नाही. फिर्यादी लोखंडे व त्यांचे काका आरोपी जोंधळे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी कोंची (ता. संगमनेर) येथे गेले असता आरोपींनी शिविगाळ करून त्यांना धमकी दिली.

या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमोल जोंधळे यास अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत सुनावली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT