Wild Buffalo Agrowon
ताज्या बातम्या

Wild Animal Rampage : हाजगोळी पंचक्रोशीत गव्यांचा धुमाकूळ

हाजगोळी बुद्रक, पेद्रेवाडी, दाभेवाडी व कोवाडे या परिसरातील शेतीमध्ये गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे.

Team Agrowon

भादवण, जि. कोल्हापूर ः उसाची लावण (Sugarcane Cultivation), खोडवा व मका कळप (Wild Buffalo) फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

चाळोबाची बारी या जंगल, काळमादेवीचा डोंगर, झरवान भावचा परिसरात गव्यांची राहुटी आहे. सांयकाळ होताच गवे कळपाने शेतीमध्ये उतरत आहेत. शेतातील उसाची तरारून आलेली लावण, खोडवा व मका ते फस्त करीत आहेत.

त्यानंतर ते पाणी पिण्यासाठी नजीकच्या पाणवठ्यावर जातात. त्यांचा हा नेहमीचा शिरस्ता झाला आहे. शेतकऱ्यांनी गव्यांना हाकलण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. पण, तरीही गवे बधेनासे झाले आहेत. रात्री अपरात्री रस्त्यावरून ये-जा करणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे.

मार्निंग वॉकला जाणाऱ्यांना गव्याचे हमखास दर्शन होते. नागोजी होरटे, परशराम होडगे, धोंडीबा हुंदळेकर, पुंडलिक हुंदळेकर (कोवाडे), संजय देसाई, सतीश देसाई (दाभेवाडी), शामराव गिलबिले, संदीप गिलबिले, परसु रामू कातकर (हाजगोळी बुद्रक) व पेद्रेवाडीतील काही शेतकऱ्यांच्या शेतीचे गव्याच्या कळपाने नुकसान केले आहे.

गव्याकडून सातत्याने नुकसान होत असल्याने शेती संकटात आली आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी दुप्पट मदत मिळावी. पंचनामे वेळेत व्हावेत.

- परसु कातकर, शेतकरी, हाजगोळी बुद्रक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT