Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पावसानं वाढवली चिंता !

हवामान विभागाना राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

Team Agrowon

पुणेः हवामान विभागाना (Wether Update) राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. हा पाऊस रब्बी पिकांसाठी (Rabi Crop) पोषक असला तरी कापूस, तूर आणि फळबागांचं नुकसान करणारा ठरला.

मनडूस चक्रीवादळ निवळल्यानंतर पूर्वमध्य अरबी समुद्रात वादळी प्रणाली निर्माण झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस पडतोय. काल राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नाशिकमध्ये २० मिलिमीटर आणि नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे १० मिलिमीटर तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे १० मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील कसमादे, सिन्नर आणि नाशिक भागात पाऊस पडला. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या तीनही जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने जामगाव, कायगाव, सोलेगाव परिसरात लोकांची दैना केली. तर कायगाव, अमळनेर, लखमापूर, जामगाव, भिवधानोरा ,अगरवाडगाव आदी भागात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगारांची फजिती केली.

विदर्भातील अकोला, बुलडाणा जिल्हयात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. प्रामुख्याने अकोला, बुलडाणा, चिखली, मलकापूर, साखरखेर्डा या भागात पावसाने हजेरी लावली. खामगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जवळपास १ ते दीड तास रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काळेगाव भागात जोरदार पावसाने नाल्याला पूरही आला. मलकापूर तालुक्यातही हलक्या स्वरुपात पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मलकापुरातील बाजारपेठेत चांगलीच धांदल उडाली होती.

या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला.. हरभरा, ज्वारी पिकासाठी पाऊस पोषक असला तरी कांदा, गहू या रब्बी पिकासाठी आणि भाजीपाला पिकासाठी नुकसान कारक आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचे संकेत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT