Watermelon Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Watermelon Cultivation : कलिंगड, खरबूज लागवडीला प्रारंभ

उन्हाळ्यात मागणी वाढणाऱ्या कलिंगड, खरबूज पिकाची लागवड सुरू झाली आहे. मार्च ते मे या काळात या फळांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरी तशाप्रकारचे नियोजन करीत आहेत.

Team Agrowon

अकोला ः उन्हाळ्यात मागणी वाढणाऱ्या कलिंगड (Watermelon), खरबूज पिकाची लागवड (Watermelon Cultivation) सुरू झाली आहे. मार्च ते मे या काळात या फळांना चांगला दर मिळत असल्याने शेतकरी तशाप्रकारचे नियोजन करीत आहेत.

कमी कालावधीत चांगला पैसा मिळवून देणारे पीक म्हणून कलिंगड, खरबूज शेती गेल्या काही वर्षांत फायदेशीर ठरते आहे. त्यामुळे या पिकाला व्यावसायिकतेचा दर्जाही मिळत आहे.

शेतकरी व्यवस्थापनावर मोठा खर्च करीत असतात. पूर्वी कलिंगडाची लागवड केवळ नद्यांच्या कोरड्या पात्रात व्हायची. आता ही पिके शेतांमध्ये घेतली जातात. पिकाला ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापरसुद्धा वाढला आहे.

सोबतच सूक्ष्म अन्नद्रवे, कीडनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर हे उत्पादक करीत असतात. काही शेतकरी तर पिकाला सुरुवातीच्या काही दिवसांसाठी क्रॉप कव्हरसुद्धा वापरतात.

या सर्व बाबींमुळे कलिंगड शेतीत उत्पादन खर्च भरमसाट वाढलेला आहे. तरीही हे पीक पैसा मिळवून देत असल्याने शेतकरी लागवडीकडे सातत्याने वळत आहेत.

जिल्ह्यात काही शेतकरी तर वर्षात दोन ते तीन वेळा कलिंगड लागवड करीत असतात. बहुतांश शेतकरी हे उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून लागवड सुरू करतात.

कलिंगडाला उन्हाळ्यात सर्रास २० रुपये प्रतिकिलोचा दर या भागात मिळतो. शेतकऱ्यांनाही १० रुपयांपासून दर मिळायला लागतात. चांगल्या दर्जाच्या फळांना याहीपेक्षा अधिक दर मिळतो.

सध्या कलिंगड, खरबूज लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी करून १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. वेल वाढीला सुरुवात झाली. त्यातच आता ढगाळ वातावरण राहत असल्याने थोडी चिंता वाटते आहे.

या पिकांसाठी चांगले वातावरण पोषक ठरत असते. त्यामुळे जिल्ह्यातील कलिंगड खरबूज लागवडीचे क्षेत्र आता ५०० हेक्टर पेक्षा अधिक उन्हाळ्याच्या दिवसात राहत असल्याचे मागील काही वर्षात समोर आलेले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT