Koyna Dam Agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam : कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाच टीएमसीने कमी पाणीसाठा

राज्याच्या वीज निर्मितीच्या दुष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत ५.७५ टीएमसीने कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Satara News राज्याच्या वीज निर्मितीच्या (Power Generation) दुष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात (Koyna Dam) गतवर्षीच्या तुलनेत ५.७५ टीएमसीने कमी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणात सध्या एकूण ६०.८७ टीएमसी म्हणजेच ५७.८३ टक्के पाणीसाठा (Water Storage) उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात कमी, तर तारळी, धोम-बलकवडी धरणात जास्त, तर धोम, कण्हेर, उरमोडी या धरणात गतवर्षी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात दमदार पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे पाण्याने भरून वाहिली होती.

कोयना धरणात गतवर्षी ६६.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होते. तुलनेत यावर्षी ५.७५ टीएमसीने कमी असून, धरणात ६०.८७ टीएमसी पाणी आहे. तारळी धरणात गतवर्षी ३.६७ टीएमसी पाणी शिल्लक होते.

यावर्षी ४.३५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धोम-बलकवडी धरणात गतवर्षी १.२५ टीएमसी तर सध्या १.७८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धोम, कण्हेर, उरमोडी धरणात गतवर्षीच्या दरम्यान पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या धोम धरणात ८.१८, कण्हेर ४.७९ व उरमोडी धरणात ६.८५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे.

प्रमुख धरणांतील पाण्याची एकूण टक्केवारी

कोयना - ५७.८३, धोम- ६०.६३, कण्हेर- ४७.४२, उरमोडी- ६८.७९, धोम-बलकवडी- ४३.६२, तारळी- ७४.३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT