Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांकडे

पुणे जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे त्या भागातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः उजनी धरणाकडे (Ujani Dam) वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग (Water Discharge In Ujani) सोमवारी (ता. २५) पुन्हा अखंडपणे सुरुच होता. त्यामुळे धरणातील पाणी पातळी (Dam water Level) झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात ५० टक्क्यांची पातळी गाठलेले धरण आता ७० टक्क्यांकडे निघाले आहे.

पुणे जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे त्या भागातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. आधी ५० हजार क्युसेकने सोडण्यात येणारे पाणी, पावसाच्या विश्रांतीमुळे आता कमी करण्यात आले आहे. तरीही सध्या १० हजार ४४५ क्युसेकने पाणी धरणात येत आहे.

त्यामुळे संथ का होईना, पण धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सोमवारी (ता. २५) दुपारी बाराच्या सुमारास धरणातील एकूण पाणी पातळी ४९५.२५० मीटरपर्यंत होती. तर एकूण साठा ९९.२२ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा ३६.०६ टीएमसी एवढा होता. तर या पाण्याची टक्केवारी ६७.३२ टक्क्यांवर पोचली. त्यामुळे धरणाची पातळी ७० टक्क्यांकडे निघाली आहे. अवघ्या अडीच टक्क्यांनी ती कमी आहे. आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत धरण ७० टक्केचा टप्पा पार करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT