Pune Rain Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील आवक घटली

Pune Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Pune Monsoon News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. धरणांतील पाण्याच्या आवकेत घट झाली आहे.

सोमवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यतच्या २४ तासांमध्ये ५.१८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणांतील पाणी पातळी स्थिर होऊ लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील २६ धरणक्षेत्रात मागील १८ जुलैपासून जोरदार पावसास सुरुवात झाली होती. २० जुलैपासून पावसामध्ये चांगलीच वाढ झाली होती. २५ जुलै रोजी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने २६ जुलै रोजी सकाळी २४ तासांतील धरणांतील पाण्याची आवक जवळपास साडे ९.४५ टीएमसीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे खडकवासला, कळमोडी, चासकमान अशी काही धरणे शंभर टक्के भरल्याने या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याची वेळ आली होती.

इतरही अनेक धरणांतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली असून काही धरणे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. या पावसामध्ये सातत्य राहिले असते, तर येत्या आठ दिवसांत निम्म्याहून अधिक धरणे भरली असती. परंतु त्याच काळात पावसाचा काही प्रमाणात प्रभाव कमी झाल्याने आवकेत काही प्रमाणात घट झाली आहे. धरणांत पाच टीएमसीपर्यंत आवक खाली आली असल्याने येत्या काळात पावसाने चांगलीच उघडीप दिल्यास या आवकेत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

पश्चिम पट्यातील वळवण घाटमाथ्यावर ११८ मिमी पाऊस पडला. तर लोणावळा ९३, शिरोटा ८०, कुंडली ६८, मुळशी ५९, ठोकरवाडी ५१ मिमी पाऊस पडला. त्यामुळे धरणांत काही प्रमाणात आवक सुरू असली तरी धरणांतील पाणी पातळीत फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात चांगलीच उघडीप दिली आहे. तर निरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाच्या कमीअधिक सरी कोसळत आहेत.

त्यामुळे या खोऱ्यातील धरणांतील पाण्यामध्ये काहीशी आवक होत आहे. निरा देवघर धरणक्षेत्रात ७७ मिमी, तर पवना, ७०, गुंजवणी ६८, कळमोडी ४०, वडीवळे ४२, आंध्रा ३४ मिमी पाऊस पडला.

तर कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, शेटफळ, नाझरे, भाटघर, वीर या धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभेर, चिल्हेवाडी, घोड या धरणक्षेत्रात हलक्या सरी कोसळल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT