Rain Update Pune Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणांतील पाण्याचा विसर्ग बंद

चालू वर्षी मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसाने चांगलीच सुरुवात केली होती. जून महिन्यात कमी पाऊस झाला असला, तरी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने (Rain Update Pune) उघडीप दिली असल्याने धरणांत पाण्याची आवक (Water Inflow Dam) कमी होत आहे. सध्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी (Dam In Pune) अशा धरणांतून नदीला सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग (Water Discharge) बंद करण्यात आला असून, काही धरणांतून सोडण्यात आलेला विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून, पाणीटंचाई कमी भासण्याचे संकेत जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले.

चालू वर्षी मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसाने चांगलीच सुरुवात केली होती. जून महिन्यात कमी पाऊस झाला असला, तरी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली.

त्यामुळे नद्या ओसंडून वाहत असल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ही धरणे शंभर टक्के भरली. प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने धरणे भरण्यास मदत झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली असून, पाण्याच्या विसर्गात घट केली आहे. जिल्ह्यात जवळपास २६ धरणे आहेत. त्यापैकी १९ धरणे ही शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. उर्वरित धरणांत ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने पुन्हा चांगलाच धुमाकूळ घातल्यास धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.

त्यातच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये खडकवासला, वडज, चासकमान, पवना, वरसगाव, पानशेत, वीर, उजनी, डिंभे, घोड, आंध्रा, भामा आसखेड, कळमोडी अशा धरणांतून सांडव्याला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भीमा, मुळा, मुठा, कऱ्हा, अशा नद्या दुथडी भरून वाहिल्या होत्या. तसेच उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पिकांनाही पाणी मिळाले असून, विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती.

दृष्टिक्षेपात पुणे जिल्ह्यातील धरणनिहाय असलेला उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

टेमघर ३.७१, वरसगाव १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.९७, पवना ८.५१, कासारसाई ०.५७, कळमोडी १.५१, चासकमान ७.५८,भामा आसखेड ७.६१, आंध्रा २.९२, वडीवळे १.०७, शेटफळ ०.६२, नाझरे ०.५९, गुंजवणी ३.६९, भाटघर २३.५१, निरा देवघर ११.७३, वीर ९.४१, पिंपळगाव जोगे, ३.५६, माणिकडोह ९.१३, येडगाव १.८०, वडज १.१४, डिंभे १२.५०, चिल्हेवाडी ०.७६, घोड ४.७७, विसापूर ०.९०, मुळशी १९.८५, उजनी ५५.६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT