Dam Water  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Dam Water : चौदा धरणक्षेत्रांत पाणी स्थिती चिंताजनक

Water Crisis : पाऊस कालावधीचा सव्वा महिना उलटला तरी धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अजूनही १४ धरणांतील पाण्यामध्ये वाढ झालेली नाही.

Team Agrowon

Pune News : पाऊस कालावधीचा सव्वा महिना उलटला तरी धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अजूनही १४ धरणांतील पाण्यामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे चिंताजनक स्थिती तयार झाली आहे. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास भविष्यात पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

२४ जूननंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला होता. सुरवातीच्या दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमी होता.

त्यानंतर २५-२६ जूनपासून पावसाचा जोर काहीसा वाढला. या काळात धरणक्षेत्रात आणि पश्चिम घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे ओढे, नाले चांगलेच वाहते झाले. त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे.

आत्तापर्यंत ठराविक धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडला असला तरी बहुतांश धरणक्षेत्रांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांत आत्तापर्यंत नव्याने ४.३३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

या सर्वच धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला आहे. परंतु नीरा आणि कुकडी खोऱ्यातील धरणक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. या धरणक्षेत्रात अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या धरणांत पाणी साठा कमी असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामध्ये कासारसाई, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, उजनी अशा धरणांत पुरेसा पाणीसाठा झालेला नाही.

घाटमाथ्यावर जोर

सध्या ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली, ताम्हिणी या घाटमाथ्यावर पाऊस होत आहे. परंतु या घाटमाथ्यावरील सर्व पाणी हे खासगी धरणांत जात आहे. मुळशी, पवना, कळमोडी, चासकमान, वडिवळे, भाटघर, नीरा देवघर, येडगाव, चिल्हेवाडी अशा धरणक्षेत्रांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणांतील पाण्यामध्ये काहीशी वाढ झाली आहे. याच धरणक्षेत्रात पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळत असल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT