IDA Fellowship-2023
IDA Fellowship-2023 Agrowon
ताज्या बातम्या

IDA Fellowship-2023 : विश्‍वास चितळे यांचा गांधीनगर येथे ‘आयडीए फेलोशिप-२०२३’ ने गौरव

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : दुग्धउद्योगातील शिखर संस्था असलेल्या भारतीय डेअरी असोशिएशनच्या (Dairy Association of India) वतीने येथील चितळे उद्योग समूहाचे (Chitale Industries Group) संचालक विश्‍वास चितळे (Vishwas Chitale) यांना ‘आयडीए फेलोशिप -२०२३’ने गौरवण्यात आले आहे.

गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या ४९ व्या डेअरी उद्योग परिषदेत मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला व इंटरनॅशनल डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष प्रिक्रिस्टॅनियो ब्रॅझल यांच्या हस्ते चितळे यांचा सन्मान झाला. ‘आयडीएफ’चे संचालक कॅरोलिन एमंड, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, ‘जीसीएमएमएफ’चे चेअरमन श्यामलभाई पटेल, ‘एनडीडीबी’चे अध्यक्ष मिनेशभाई शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.


गेल्या ८४ वर्षांहून अधिक काळ सांगलीसह राज्यभरात आपल्या दर्जेदार दुग्ध उत्पादनांमुळे या चितळे समूहाची ओळख आहे. पारंपरिक डेअरी उद्योगात नवे तंत्रज्ञान आणून ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यात चितळेंच्या तिसऱ्या पिढीचे सदस्य असलेल्या विश्‍वास यांनी दिलेल्या भरीव योगदानाचा यनिमित्ताने गौरव झाला आहे.

सुमारे पन्नास हजार शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात बदल आणण्याचे श्रेय या समूहाला जाते. अलीकडेच डेअरीतर्फे आशियातील सर्वांत मोठी लिंग वर्गीकरणाची वीर्य प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे. चितळे यांच्या ५० सॅटेलाइट डेअरी फार्म आणि दहा हजारांवर लहान-बोल्डिंग डेअरी फार्म कार्यरत आहेत. या समूहाने आपले सामाजिक दायित्वही कायम ठेवत अखंड योगदान दिले आहे. ही फेलोशिप चितळे समूहाच्या आजवरच्या कार्याची पोहोच असल्याची भावना त्यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT