MSEDCL 
ताज्या बातम्या

Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

महावितरण’कडून कृषिपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेत नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांवरही अन्याय होत आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः ‘महावितरण’कडून कृषिपंपांच्या (Agriculture Electricity) थकीत वीजबिल वसुलीसाठी (Electricity Bill) मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेत नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांवरही अन्याय होत आहे. त्यातूनच अकोळनेर (ता. नगर) येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव (वय ५५) यांनी महावितरणच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

त्यामुळे गावकरी, शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संबंधित शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितल्याने चांगला पेच निर्माण झाला.

नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट जाधव यांनी रब्बीतील पिकांची पेरणी केली, मात्र आठ महावितरणने त्यांच्या कृषिपंपाची वीज तोडली असल्याने पिकांना पाणी देता येत नव्हते. डोळ्यादेखत नुकसान होत असल्याने जाधव यांनी सोमवारी (ता. २८) पहाटे आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा नातेवाइकांनी केला.

अकोळनेर येथे शेतकरी महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर महावितरण अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका जाधव कुटुंबीय व शेतकऱ्यांनी घेतली. शेतकऱ्यांबरोबरच महाविकास आघाडीचे नेतेही आक्रमक झाले.

आमदार निलेश लंके, घनश्‍याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शेतकरी संघटनेचे बच्चू मोढवे यांच्यासह अकोळनेर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्याकडे भूमिका मांडली. मापारी यांनी महावितरण व पोलिस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण केले. त्यानंतर आंदोलक व अधिकाऱ्यांत चर्चा झाल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर रात्री उशिरा जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT