Vasantdada Sugar Institure Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : विदर्भात ऊस शेतीसाठी व्हिएसआय करणार शेतकऱ्यांना मदत

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या भागातली शेतकऱ्यांना उसाची शेती आणि उपपदार्थ निर्मिती कशी करायची, यासाठी प्रशिक्षण देईल.

Team Agrowon

Sugarcane Farming : विदर्भातील शेतकऱ्यांना उसाचे पीक घेण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) (व्हिएसआय) मदत करणार आहे.

ऊस शेतीला प्रोत्साहन देऊन विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) बऱ्याच अंशी रोखल्या जाऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. नागपूर येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेल्या पवारांनी शनिवारी (ता. १) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार म्हणाले की, वेगवेगळ्या पिंकाची लागवड केल्यास शेतकरी संकटातून वाचविले जाऊ शकते.

विदर्भातील शेतकरी प्रदीर्घ काळापासून विदर्भातील शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही पिके घेत असून त्याचे समाधानकारक परिणाम दिसत नाहीत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या भागातली शेतकऱ्यांना उसाची शेती आणि उपपदार्थ निर्मिती कशी करायची, यासाठी प्रशिक्षण देईल. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असे मला वाटते.

उसापासून साखरेसोबतच इथेनॉलचेही उत्पादन आपण करू शकतो. जर मराठवाडा, खानदेशातील शेतकरी उसाचे पीक घेऊ शकतात, तर विदर्भातील शेतकरी का घेऊ नाही शकत, असेही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, गडकरी यांनी 'व्हीएसआय'चे उपकेंद्र विदर्भात व्हावे, यासाठी आग्रह धरला होता. यासाठी त्यांनी १०० एकर जमिनीची पाहणीही केली. ज्यावर व्हिएसआयचे उपकेंद्र विकसित केले जाऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT