Millet Production Agrowon
ताज्या बातम्या

Millet Production : शहापूर तालुक्यात वरई उत्पादन घटले

आदिवासी डोंगराळ व पठारी पट्ट्यात भातपिकासोबत जोडपीक म्हणून घेतले जाणारे वरई पीक यंदा अतिपर्जन्यमानामुळे घटले आहे. त्‍यामुळे वरई विक्रीतून होणारा नफा अल्प प्रमाणात मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Team Agrowon

किन्हवली : आदिवासी डोंगराळ व पठारी पट्ट्यात भातपिकासोबत (Paddy Crop) जोडपीक म्हणून घेतले जाणारे वरई पीक (Varai Crop) यंदा अतिपर्जन्यमानामुळे (Heavy Rain) घटले आहे. त्‍यामुळे वरई विक्रीतून होणारा नफा अल्प प्रमाणात मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

शहापूर तालुका हा दुर्गम व डोंगराळ भागांनी व्यापला असल्याने तालुक्यात पठारी व उताराचा भाग आहे. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजासोबत शेतकरीवर्ग असून या भागात पारंपरिक पद्धतीने उतारावर नाचणी, वरई, तीळ, खुरसणी आदी पिकांची लागवड करण्यात येते. सपाट भूभागात भातशेती, तर उतारावरील माळरानात नाचणी व वरईची पिके घेण्यात येत आहेत.

खरिप हंगामात शहापुरात नाचणी, वरईचे पीक तीन हजार हेक्टरवर घेण्यात येते. भातापेक्षा वरईच्या विक्रीतून शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो; पण यंदा अतिपर्जन्यमानामुळे लागवड उशिरा झाली. त्‍यातही लोंब्‍या काही प्रमाणात गळून पडल्याने यंदा वरईचे उत्पन्न घटले आहे.

वरई आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असून, शहरी भागात दरही चांगला मिळतो; मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटले, तर लागवडीसाठी झालेला खर्चही निघत नाही.

- लक्ष्मण गावंडा, फणसवाडी-टाकीपठार (शेतकरी)

वरईच्या पिकासाठी कृषी विभागाकडून बियाणे पुरविले जाते नसले तरी आवश्यक तिथे आधुनिक शेती तंत्राचा वापर करून वरईचे पीक कसे घ्यावे याचे मार्गदर्शन नक्कीच केले जाईल.

-अमोल अगवान, तालुका कृषी अधिकारी, शहापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT