Nashik APMC
Nashik APMC Agrowon
ताज्या बातम्या

Vegetable Rate: नाशिकमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक वाढल्याने दरात घसरण

टीम ॲग्रोवन

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात वालपापडी-घेवड्याची (Vegetables Rate) आवक ३,९१० क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले. वालपापडीला प्रतिक्विंटल ५,५० ते ७,००० असा तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला.

घेवड्याला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,५०० तर सरासरी दर ३,८०० रुपये राहिला. त्यापूर्वीच्या सप्ताहात वालपापडी-घेवड्याची आवक २,९३१ क्विंटल होती. वालपापडीला सरासरी दर ९,००० रुपये तर घेवड्याला सरासरी दर ८,००० रुपये होता.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. हिरवी मिरचीची आवक ९३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ५,००० ते ६,००० रुपये तर सरासरी दर ५,५०० रुपये मिळाला. गाजराची आवक २,६१८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ४,००० तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला.

उन्हाळ कांद्याची आवक १६,२०१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २,३०० तर सरासरी दर १,५५० रुपये राहिला. लसणाची आवक १०४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ८,३०० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ८,२६५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,३५० ते १,९०० तर सरासरी दर १,६५० रुपये राहिला.

आद्रकची आवक २८८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,००० ते ६,००० तर सरासरी दर ५,००० रुपये राहिला. फळभाज्यामध्ये टोमॅटोला ७० ते ७०० तर सरासरी ४२५, वांगी ४०० ते ८०० तर सरासरी ६००, फ्लॉवर १५० ते ४८५ सरासरी ३५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १३० ते २८० तर सरासरी २०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३५० ते ९०० तर सरासरी दर ७०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ४० ते २५० तर सरासरी १५०, गिलके १४० ते २१० तर सरासरी १७०, दोडका ८० ते ३०० तर सरासरी दर १६० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,७३६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५०० तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक २,५०७ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते १०,००० तर सरासरी ७,५०० रुपये दर मिळाला.

पालेभाज्या प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

गावठी कोथिंबीर...५,०००...१६,१००...१२,०००

मेथी...४,०००...१०,६००...९,४००

शेपू...१,५००...३,०००...२,२५०

कांदापात...२,५५००...५,३००...३,५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT