Lumpy Vaccination  Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Vaccination : बरंजळा लोखंडेत ४६५ जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

बळीराजा फाउंडेशनने खर्च उचलून ४६५ जनावरांचे मोफत लसीकरण केले. या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

टीम ॲग्रोवन

भोकरदन : तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथे जनावरांचे लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारापासून रक्षण व्हावे, या साठी बळीराजा फाउंडेशनने खर्च उचलून ४६५ जनावरांचे मोफत लसीकरण (Free Vaccination) केले. या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे (Narayan Lokhande) यांच्या हस्ते करण्यात आला.

बरंजळा येथे शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे दुधाळ जनावरांची संख्या गावामध्ये मोठी आहे. तालुक्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे आजाराच्या धास्तीने पशुपालक चिंतेत सापडले आहेत.

तसेच जिल्ह्यात बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांत लस उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे बळीराजा फाउंडेशनने पुढाकार घेऊन स्वखर्चाने लशी उपलब्ध करून मोफत लम्पी स्कीन लसीकरण शिबिर आयोजित केले. यामध्ये ४६५ जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले. वाड्या -वस्त्यांवर तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन लसीकरण करण्यात आले.

यामध्ये पशुधन पर्यवेक्षक डॉ. योगेश देठे, डॉ. ज्ञानेश्वर भालेराव, राम जाधव यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. या वेळी नारायण लोखंडे, संदीप भोकरे, अनिल भुतेकर, किसन गोठवाल, गणेश लोखंडे, गजानन लोखंडे, अमोल खांडवे, राहुल साबळे, समाधान साबळे, समाधान लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे आदीची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT