Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : अकोला जिल्ह्यात कृषी विभागातील रिक्त पदांमुळे कामांची ओढाताण

Akola Agriculture Department : जिल्ह्यात कृषी विभागात रिक्त पदांचा अनुशेष पुन्हा वाढला असून महत्त्वाच्या पदांवर काम करायलाही अधिकारी नसल्याने प्रभारी कारभार सुरू आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात कृषी विभागात रिक्त पदांचा अनुशेष पुन्हा वाढला असून महत्त्वाच्या पदांवर काम करायलाही अधिकारी नसल्याने प्रभारी कारभार सुरू आहे. याचा फटका योजनांच्या अंमलबजावणीवर होत असून, शासनाने तातडीने याची दखल घेण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

शासनाने गेल्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मोहीम राबवली. यात जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांना दुसऱ्या विभागात, जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले. मात्र येथे नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या जिल्ह्यात तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर या महत्त्वांच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारीच नाहीत.

अकोट उपविभागीय कृषी अधिकारी पदही रिक्त आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात कृषी अधिकारी, कृषी उपसंचालकांचे पद महिनोमहिने रिक्त ठेवल्या जात आहे. शिवाय कृषी सहायकांचीही ७० पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने गाव पातळीवर योजनांची अंमलबजावणी करण्यात आडकाठी निर्माण होत आहे.

इतर संवर्गाचीही पदे रिक्त आहे. वास्तविक अकोला हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी एक आहे. शिवाय कृषी क्षेत्रात या जिल्ह्याचे वेगळे स्थान आहे. असे असतानाही कृषी खात्याच्या वरिष्ठांकडून जिल्ह्यातील पदभरतीबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

आता खरीप हंगाम सुरू झाला. या हंगामात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणेची नितांत गरज आहे. असे असतानाही अधिकारी बदली करून दुसरीकडे पाठवताना जिल्ह्यात पुन्हा अधिकारी दिले जात नसल्याची स्थिती समोर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT