Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी जैविक खते वापरा

Organic Fertilizer : रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे उत्पादन खर्च वाढीबरोबरच जमिनीची सुपीकता देखील कमी होत आहे.

Team Agrowon

Pune News : रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे उत्पादन खर्च वाढीबरोबरच जमिनीची सुपीकता देखील कमी होत आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच जमिनीची सुपीकता संवर्धनासाठी जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी केले.

बोरघर (ता. आंबेगाव) येथील आनंद कपूर प्रशिक्षण केंद्रात कृषी विभागाच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत आदिवासी भागातील शेतकरी गटांच्या कार्यशाळेचे आयोजन गुरुवारी (ता. ८) करण्यात आले होते. या वेळी आदिवासी भागात सेंद्रिय शेतीत भाग घेतलेल्या १५ शेतकरी गटांच्या ३०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यशाळेला उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश यादव, ‘ग्रीनसर्ट’ यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित कैसारे, ‘नेचर्स केअर’ या सेंद्रिय शेतीचे कार्य करणारे सुहास कार्लेकर, लातूर येथील स्वतः सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी मनोहर भुजबळ उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी आंबेगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, मंडल कृषी अधिकारी रामचंद्र बारवे, प्रकाश आंबेकर, चंद्रकांत डामसे व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व आत्मा विभागाकडील तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसाद राऊत, तज्ज्ञ मार्गदर्शक नितीन खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

या वेळी प्रकल्प संचालक (आत्मा) विजय हिरेमठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिभाऊ पाबळे तंत्रज्ञान यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT