Team Agrowon
शेतकरी खरीप किंवा रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर पुढील पिकांच्या पेरणीसाठी शेतजमीन मोकळी होण्यासाठी शेतजमिनीमध्ये अवशेष जाळले जातात
पूर्वी जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला होता, म्हणुन जमिनीची उत्पादकता चांगली होती. आता बहुतेक जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी आहे. म्हणून जमीनीची उत्पादकता कमी आहे.
जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर, कंपोस्ट खत देणे, पिकांची फेरपालट करणे, पिकांचे अवशेष जमिनीतच गाडणे, हिरवळीची पिके जमिनीत गाडणे असे विविध पर्याय आहेत. दरवर्षी ते कपाशीचे पीक १६५ दिवस झाले की जमिनीत गाडून टाकतात
अकोला जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी गणेश नानोटे यांनी जमीन सुपिकतेला प्राधान्य देऊन शेती पद्धती अंगिकारली.
दरवर्षी ते कपाशीचे पीक १६५ दिवस झाले की जमिनीत गाडून टाकतात
पीक अवशेषाचे तुकडे करतानाच सोबत नांगरटी केली जाते
गव्हाचे काड कुजण्यासाठी पाटसरीने पाणी सोडले जाते. त्यानंतर ते शेतात गाढतात
त्यामुळे त्यांच्या जमिनीचा सेंद्रीय कर्ब टिकून आहे. शिवाय सोयाबीनसारख्या पिकाला रासायनिक खत मात्रा देणेही बंद केले आहे.