Nancy Pelosi Agrowon
ताज्या बातम्या

तैवानच्या स्वायत्ततेसाठी अमेरिका कटिबद्ध: नॅन्सी पेलोसी

जगासमोर आज लोकशाही (Democracy) आणि हुकूमशाही (Dictatorship) यात एकाला निवडण्याचे मोठे आव्हान आहे. तैवानच नाही तर जगभरात लोकशाहीचे संरक्षण करण्यास अमेरिका (USA) कटिबद्ध आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

तैपेई (वृत्तसंस्था) : चीनच्या विरोधाला न जुमानता तैवानमध्ये दाखल झालेल्या अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी स्वायत्ततेबाबत तैवानला दिलेला शब्द पाळण्यास अमेरिका (USA) कटिबद्ध आहे, अशा शब्दांत ग्वाही दिली. दरम्यान, तैवानच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर नॅन्सी पेलोसी या बुधवारी आपल्या शिष्टमंडळासह दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या.

अमेरिकी लोकप्रतिनिधीप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांचे शिष्टमंडळ चीनला न जुमानता मंगळवारी तैवानची राजधानी तैपेई येथे दाखल झाले. तब्बल पंचवीस वर्षाच्या खंडानंतर अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांनी तैवानचा दौरा केला आहे. यापूर्वी १९९७ मध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष न्यूट गिंगरिक यांनी तैवानला भेट दिली होती.

पेलोसी यांच्या शिष्टमंडळाने आज तैवानच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. अध्यक्ष त्साई यांनी तैवानला पाठिंबा दिल्याबद्दल पेलोसी आणि अमेरिकेचे आभार मानले. यावेळी तैवानचा नागरी पुरस्कार ’द ऑर्डर ऑफ द प्रोपिट्स क्लाऊस’ ने पेलोसी यांना गौरविण्यात आले. अध्यक्ष त्साई इंग वेन यांच्या भेटीनंतर निवेदन जारी करण्यात आले.

त्यात म्हटले की, जगासमोर आज लोकशाही (Democracy) आणि हुकूमशाही (Dictatorship) यात एकाला निवडण्याचे मोठे आव्हान आहे. तैवानच नाही तर जगभरात लोकशाहीचे संरक्षण करण्यास अमेरिका (USA) कटिबद्ध आहे. तैवानचे सार्वभौमत्व (Sovereignty) अबाधित ठेवण्याबाबत दिलेला शब्द पाळण्याबाबत अमेरिका कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.

काल रात्री नॅन्सी पेलोसी यांचे शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनने तैवानच्या चोहोबाजूंनी युद्धसरावाची घोषणा केली आणि धमकीवजा इशारेही देण्यात आले. चिनी लष्कराच्या २१ लढाऊ विमानांनी तैवानच्या नैऋत्य भागात उड्डाणे करत शक्तीप्रदर्शन केले. तैवानचा दौरा आटोपल्यानंतर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या. यादरम्यान चीनने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

तैवानच्या सीमेवर लष्करी सराव गरजेचा आहे, असे चीनने म्हटले आहे. अमेरिकेने ‘वन चायना पॉलिसी’ च्या कराराचे उल्लंघन केल्याचे चीनने म्हटले होते. नॅन्सी पेलोसीच्या तैवान दौऱ्याने पाकिस्तानही भडकला आहे. पेलोसी यांच्या भेटीमुळे प्रादेशिक शांतता प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे.

नॅन्सी पेलोसीच्या हायप्रोफाईल भेटीवर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अमेरिकेच्या राजदूतास पाचारण केले. अमेरिकेला या चुकीची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेने तैवानमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी तंबीही दिली आहे.

चीनचे उपपरराष्ट्रमंत्री झी फेंग यांनी अमेरिकी राजदूत निकोलस बर्न्स यांना बोलावून काल रात्रीच या भेटीचा निषेध नोंदविला होता. सीसीटीव्ही या सरकारी वाहिनीवर पीएलएचे सैनिक कवायत असल्याचे दाखविण्यात आले. परंतु कवायतीचे ठिकाण मात्र उघड केले नाही.

आपल्याला तैवानच्या सर्वंकष विकासाबाबत चर्चा करायला हवी आणि नागरिकांना तैवान लोकशाहीवादी करण्यासाठी धाडस दाखवावे लागेल.
नॅन्सी पेलोसी, अध्यक्षा, लोकप्रतिनिधीगृह
तैवानमध्ये शांतता आणि स्थिरता राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आशियायी-प्रशांत क्षेत्रात खुले आणि स्वतंत्र वातावरण राहण्यासाठी प्रादेशिक सुरक्षा म्हणून तैवान एक दीपस्तंभ म्हणून नावारूपास येऊ शकतो.
त्साई इंग वेन, अध्यक्ष तैवान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT