Shinde & Thackeray Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यासंबंधीचे पत्र जारी केले. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

Team Agrowon

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे ३९ आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे हे (Eknath Shinde) शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केले. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. ही पक्षांतर्गत कारवाई असून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे नेतेपद काढण्यात येईल, असे सांगण्यात येत होते मात्र तेव्हा ते कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पत्र जारी करत ही कारवाई केली आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली होती, तसेच ते शिवसेनेचेच मुख्यमंत्री असल्याचे देखील सांगत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान शिवसेनेकडून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचीका करण्यात आली होती. बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करत यासंदर्भात दाखल याचिकांवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने ११ जुलै रोजीच सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

आता यावर शिंदे गट नेमका काय पवित्रा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेतेपदावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काढल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

केसरकर म्हणाले की, ज्यावेळी एखादे नेते मुख्यमंत्री असतात, तेव्हा ते सभागृहाचे नेते असतात, ते महाराष्ट्राचे नेते असतात.त्यामुळे तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही हटणार नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता विधिमंडळाचे नेते बनले आहेत. त्यामुळे त्यांचे छोटे पद गेले तर त्यामध्ये कमीपणा काय? असा प्रश्नही यावेळी केसरकरांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT