Leopard Cub Death Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Cub Death : बिबट्याच्या दोन बछड्यांचा विहिरीत पडून मृत्यू

जिल्ह्यातील वालावल शिरसोसवाडी येथील एका शेतविहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोन बछड्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी (ता. ४) घडला.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील वालावल शिरसोसवाडी येथील एका शेतविहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोन बछड्यांचा मृत्यू (Leopard Cub Death) झाला. हा प्रकार रविवारी (ता. ४) घडला. वालावल येथील सुशांत चंद्रकांत मणेरकर यांची शिरसोसवाडी येथे ३० फूट खोलीची शेतविहीर आहे.

श्री. मणेरकर हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आठच्या सुमारास विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीत बिबट्याचे बछडे पडलेले दिसून आले. ही माहिती त्यांनी वन विभागाला दिल्यानंतर वनपाल अमृत शिंदे, वन्यजीव रक्षक नागेश दफ्तरदार, धुळू कोळेकर, श्रीकृष्ण परीट, अनिल गावडे, राहू मयेकर यांचे पथक तातडीने वालावलमध्ये दाखल झाले. बिबट्याला वाचविण्यासाठी पथकाने तातडीने कार्यवाही सुरू केली.

पथक विहिरीत उतरले परंतु तत्पूर्वी दोनही बछड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. हे दोन्ही बछडे मादी जातीचे आणि साधारणपणे दीड वर्षांचे होते. शवविच्छेदनानंतर बछड्यांचा मृत्यू पाण्यात गुदमरून झाल्याचे पशुसवंर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT