Sugar Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : नांदेड विभागातील वीस साखर कारखाने सुरू

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागांतर्गत यंदा तीस साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

Team Agrowon

नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागांतर्गत यंदा तीस साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गाळप परवान्यासाठी (Sugarcane Crushing) अर्ज केले आहेत. यापैकी १४ खासगी तर सहा सहकारी असे एकूण वीस साखर कारखाने सुरू झाले आहेत. या साखर कारखान्यांनी आजपर्यंत सात लाख २३ हजार टन उसाचे गाळप केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्राने दिली.

गाळप हंगाम २०२२-२०२३ साठी नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या मार्फत राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळपासाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर केला होता. यात २१ खासगी तर नऊ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला असला तरी नांदेड विभागातील १४ खासगी तर सहा सहकारी असे एकूण वीस साखर कारखाने सुरू झाले आहेत.

या साखर कारखान्यांनी आजपर्यंत सात लाख २३ हजार ४६० टन उसाचे गाळप तर पाच लाख ५८ हजार ६५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्राने दिली. सुरू झालेल्या साखर कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील एक सहकारी व तीन खासगी कारखान्याचा समावेश आहे. तर परभणी जिल्ह्यातील पाच खासगी, हिंगोली दोन खासगी व तीन सहकारी हिंगोली जिल्ह्यातील दोन खासगी व तीन सहकारी तर लातूर जिल्ह्यातील चार खासगी व दोन सहकारी साखर कारखाने सुरू झाल्याची माहिती सूत्राने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Loan Concessions: उद्योगपतींप्रमाणे हव्यात शेतकऱ्यांना सवलती: शरद पवार

Farmer ID Registration Challenges: चाळीस टक्के पीकक्षेत्र अद्याप फार्मर आयडीविना; ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीत राज्यांसमोर नोंदणीचे आव्हान

Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जमा

Cooperative Sugar Mills Loan: सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य; ‘सहकार’चा वित्त विभागाकडे प्रस्ताव

Maharashtra Monsoon Prediction: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT