Turmeric Research  Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Research : हळद संशोधन केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतीला दिशा मिळेल

Turmeric Marketing : हिंगोली जिल्ह्यातील हळदीचे चांगले मार्केटिंग केले तर इथली हळद जगात प्रथम क्रमांकावर येईल.हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भले होईल.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील हळदीचे चांगले मार्केटिंग केले तर इथली हळद जगात प्रथम क्रमांकावर येईल.हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भले होईल. त्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा व शेतकरी सन्मान,प्रशिक्षण कार्यक्रमात रविवारी (ता. १०) हिंगोली येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार प्रकाश पोहरे होते.

हळद संशोधन केंद्रांचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,हळद संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे,कसबे डिग्रस (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्रांचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी, रोहा येथील हळद काढणी पश्चात तंत्रज्ञान पदव्युत्तर संस्थेचे डॉ. जितेंद्र कदम, तंत्राधिकारी रमेश देशमुख आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक हेमंत पाटील, राज्यात हिंगोली हळदीचे सर्वाधिक क्षेत्र असल्यामुळे संशोधन केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न केले. राज्य शासनाने १०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. पाशा पटेल म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत.

लागवड ते काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे. तापमान वाढ, पावसाचे असमान वितरण यामुळे शेती मधील आव्हाने निर्माण झाली आहेत. पोहरे म्हणाले की, हळदीसाठी एफआरपी ठरवून घ्यावी. शेतीसाठी दूरगामी धोरण आखणे आवश्यक आहे. यावेळी हळद उत्पादक शेतकरी, व्यापारी, हमाल यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT