Turmeric Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Harvesting : हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

हमखास उत्पादन देणारे व नगदी पीक असल्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीमध्ये वाढ केली.

Team Agrowon

Washim News जिल्ह्यात हळद काढणीचा (Turmeric Harvesting) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षात अनेक शेतकऱ्यांना हळदीच्या उत्पादनात (Turmeric Production) मोठी घट येत आहे. हळदीचे दरही घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

हमखास उत्पादन देणारे व नगदी पीक असल्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीमध्ये वाढ केली. यावर्षी सततच्या पावसामुळे तसेच हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट दिसून येत आहे.

सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. हळद हे हमखास उत्पादन देणारे पीक असले तरी हे पीक अतिशय खर्चिक आहे. यावर्षी हळद काढणीचा खर्चही जास्त लागला. . हळदीचा दर पाच हजार ते साडेपाच हजाराच्या दरम्यान आहे.

यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे भाववाढ होणार नाही असे हळद खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

यावर्षी हळदीचा उतारा १५ ते २० क्विंटलदरम्यान येत आहे. दरवर्षीपेक्षा पाच ते १० क्विंटलपर्यंत घट आलेली आहे. यावर्षीचा उतारा व हळदीचे दर पाहता येत्या वर्षात लागवडीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT