Turmeric Harvesting : सुधारित पद्धतीने हळदीची काढणी कशी करायची?

Team Agrowon

पिकाची पाने वाळणे हे हळद पीक परिपक्वतेचे प्रमुख लक्षण मानले जाते.

Turmeric Harvesting | Agrowon

काढणीआधी १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. पाणी देणे बंद करताना प्रथम थोडेथोडे कमी करून नंतर पूर्ण बंद करावे. पाला वाळल्यानंतर जमिनीच्या वर १ इंच खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने पाला कापावा. पाला बांधावर गोळा करून ठेवून शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे.

Turmeric Harvesting | Agrowon

लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी.

Turmeric Harvesting | Agrowon

खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.

Turmeric Harvesting | Agrowon

हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो.

Turmeric Harvesting | Agrowon

हळदीचे बेणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावेत.

Turmeric Harvesting | Agrowon
Lemon market | Agrowon