Tuber Exhibition
Tuber Exhibition  Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur: कोल्हापुरात उद्यापासून कंदमुळांचे प्रदर्शन

Team Agrowon

कोल्हापूर : येथे ‘निसर्ग अंकुर’, ‘कोल्हापूर वुई केअर’ आणि ‘एनजीओ कम्पॅशन २४’ या संस्थेच्या वतीने १२ आणि १३ जानेवारी रोजी ६० कंदमुळांचे प्रदर्शन (Tuber Exhibition) भरविले जाणार आहे.

शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे दोन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत हे प्रदर्शन खुले असेल, अशी माहिती संयोजक मिलिंद धोंड, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकारांना दिली.

निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर व संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी लिहिलेल्या ‘औषधी रानभाज्या-प्रथम खंड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अशा विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती व्हावी व शेतकऱ्यांनी या कंदमुळांची शेतात लागवड करण्याच्या हेतूने हे प्रदर्शन होत आहे.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कोल्हापूरचे कृषी अधिकारी उमेश पाटील, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लई मोहन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल.

सुमारे ६० प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी प्रदर्शनात केली जाणार आहे. १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असतील.

६ ते ७ प्रकारच्या कंदांच्या पाककृतीबाबतची माहिती प्रदर्शनात दिली जाणार आहे. या वेळी हौशी खवय्यांना कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे.

प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, प्रोजेक्ट डायरेक्टर अमृता वासुदेवन आहेत. पत्रकार परिषदेला गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT