Agriculture Department  Agrowon
ताज्या बातम्या

Dairy : शेतीपूरक व्यवसायासाठी प्रयत्न करा

शेतीला पूरक जोडधंदा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे ‘आत्मा’च्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, रेशीम मत्स्य व्यवसाय, यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.

Team Agrowon

जालना : शेतीला पूरक जोडधंदा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे ‘आत्मा’च्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, (Dairy Business) रेशीम मत्स्य व्यवसाय, यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा च्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, रेशीम विभागाचे अधिकारी अजय मोहिते व इतर संलग्न विभागाच्या अधिकाऱ्यांसह आत्माचे कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. राठोड म्हणाले, की संबंधित विभागांनी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक यासाठी आपली मागणी नोंदवावी, यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन आदी शेती पूरक व्यवसायाचाही समावेश आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षण ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्याचे नियोजन करावे. तसेच या व्यवसायासाठी आवश्यक बाबी शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी प्राप्त होतील, त्यासाठी शासकीय योजनेचा लाभ घेता येईल का, याविषयी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केले जावे. केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता संबंधित शेतकऱ्याला सदर व्यवसाय उभारणीसाठी पूर्णतः मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

कृषी विभागामार्फत फवारणी साठी विषबाधा होणार नाही यांच्या दृष्टीने शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदानावर ड्रोन पुरवठा करणेबाबत चर्चा करण्यात आली, आत्मा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शेतीशाळा मध्ये संवेदनशील अवस्थे बरोबरच पीक विमा योजनेचा वर्ग आयोजित करावा व फवारणी करताना आवश्यक ती काळजी शेतकऱ्यांनी घेण्यासाठी मार्गदर्शन करावे असेही श्री राठोड म्हणाले.

विविध बाबींचा सखोल आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला . यावेळी स्मार्ट चे नोडल अधिकारी , श्रीकांत देशपांडे यांच्या, कृषी विज्ञान केंद्र चे श्रीकृष्ण सोनुने, पंडित वासरे, उद्धवराव खेडेकर, रामचंद्र गव्हाणे यांच्यासह आत्माचे प्रवीण झिने दत्तात्रय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT