Tribal Handicraft Agrowon
ताज्या बातम्या

Tribal Handicraft : ‘आदिहाट’द्वारे आदिवासींच्या कलाकुसरीला बाजारपेठ प्राप्त

आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे ‘आदिहाट’ उपक्रम सुरू झाला.

Team Agrowon

नाशिक : आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला (Tribal Handicraft) हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन (Tribal Art) करण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे ‘आदिहाट’ उपक्रम (Adihat Project) सुरू झाला.

आदिवासी विकासच्या आयुक्त आयुक्त नयना गुंडे आणि आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या हस्ते ‘अदिहाट’चे उद्‍घाटन झाले.

ठक्कर बाजार आणि महामार्ग बस स्थानक तसेच नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे ‘आदिहाट’ला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आयुक्तालयाच्या ठिकाणी मुंढेगाव आणि वाघेरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, तसेच त्र्यंबकेश्‍वर येथील आदिवासी बांधवांनी बनवलेल्या वस्तू आणि औषधे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कलाकुसरीच्या वस्तू सर्व ठिकाणी आहेत. मात्र महामार्ग बस स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे पारंपरिक धान्य उपलब्ध आहे.

आदिवासींच्या कलाकुसरीला ‘आदिहाट’मधून ग्राहक मिळून रोजगार निर्मिती होईल. लोकांनी खरेदीसाठी केलेली गर्दी बघून समाधान वाटत आहे, असे गुंडे यांनी सांगितले.

या वेळी आदिवासी अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, उपायुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, वित्त उपसंचालक हितेश विसपुते आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT