Damaged Road Agrowon
ताज्या बातम्या

Damaged Road : भिवंडी-मनोर मार्गावरील प्रवास धोकादायक

भिवंडी-वाडा-मनोर मार्गावरील पुलांची अपूर्ण कामे, जुन्या पुलांवरील संरक्षक कठड्यांची उंची कमी असल्याने हे पूल अपघाताला निमंत्रण देत आहेत.

टीम ॲग्रोवन

वज्रेश्‍‍वरी, जि. ठाणे : भिवंडी-वाडा-मनोर (Bhiwandi Wada Manor Road) मार्गावरील पुलांची अपूर्ण कामे, जुन्या पुलांवरील संरक्षक कठड्यांची उंची कमी असल्याने हे पूल अपघाताला (Road Accident) निमंत्रण देत आहेत. त्यामुळे अपूर्ण असलेल्या पुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, तसेच जुन्या पुलांवरील संरक्षक कठड्यांची उंची वाढवावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करीत आहेत.

वाडा तालुक्यात तानसा, वैतरणा, पिंजाळ व देहर्जे अशा चार मुख्य नद्या असून या नद्यांवरून भिवंडी-वाडा-मनोर हा राज्य मार्ग जातो. या नद्यांवर गेल्या अनेक वर्षांपूर्वी पूल बांधलेले आहेत, पण या पुलांवरील संरक्षक कठड्यांची उंची कमी असल्याने या पुलांवरून पडून अनेक अपघात झाले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी तानसा नदीच्या पुलांवरून पडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला होता. काही महिन्यांपूर्वी वैतरणा नदीवर एका जीपला अपघात झाला होता.

तानसा, वैतरणा, पिंजाळ या नद्यांवर पूल बांधले आहेत. या पुलांवर संरक्षक कठडे आहेत. अपघात रोखण्यासाठी कठड्यांची उंची वाढवणे गरजेचे आहे.

- अनंता वनगा, अध्यक्ष, आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT