Pune APMC | APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : पुणे बाजार समितीत कच्च्या पावत्यांवर व्यवहार

पुणे बाजार समितीमध्ये डमी अडत्यांद्वारे केवळ कच्च्या पावत्यांवर शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून, अशा व्यवहारांचा सुळसुळाट झाला आहे.

Team Agrowon

Pune APMC News पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये (Pune APMC) डमी अडत्यांद्वारे (Dummy Adtiya) केवळ कच्च्या पावत्यांवर शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून, अशा व्यवहारांचा सुळसुळाट झाला आहे. या व्यवहारांमध्ये पहिल्यांदा रोखीने पैसे दिले जातात. नंतर मात्र शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याची गंभीर प्रकरणे समोर येत आहेत.

असाच एक प्रकार सनदी अधिकाऱ्यांच्या भावाच्या बाबतीत समोर आला होता. सनदी अधिकाऱ्याचा भाऊ असल्याने पैसे मिळाले. मात्र हे पैसे मिळविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या भावाला बाजार समितीचे उंबरे झिजवावे लागले.

बाजार समितीमधील फळे-भाजीपाला विभागातील अनेक गाळ्यांवर दैनंदिन भाडेतत्त्वावर डमी व्यापारी काम करत आहेत. या अडत्यांद्वारे शेतकऱ्यांकडून परस्पर शेतीमाल मागविला जाऊन त्याची खरेदी विक्री होते.

मात्र हा व्यवहार संबंधित गाळेमालकाच्या परवानाधारक अधिकृत हिशेबपट्टीवर न होता साध्या कागदाच्या चिठ्ठीवर होतो. यामध्ये बाजार शुल्क चोरीदेखील होत आहे. याला बाजार समिती प्रशासनातील अनेकांचे आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, डमी अडत्यांवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून जागा वापराचा दैनंदिन भाडे आकारणीचा प्रस्ताव बाजार समितीने पणन संचालकांकडे पाठविला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची स्थिती आहे.

चार कोटी रुपयांची वसुली

गेल्या तीन वर्षांत बाजार समितीने अधिकृत आणि अनधिकृत अडत्यांकडील थकित असलेल्या १०० प्रकरणांचा निपटारा करून सुमारे ४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत.

शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करताना अधिकृत हिशबपट्टीचा आग्रह धरावा. तरच पैसे थकविल्याचा पुरावा शेतकऱ्यांकडे असतो. केवळ कागदी चिठ्ठीवर व्यवहार करू नयेत.

- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT