Farmer Training Agrowon
ताज्या बातम्या

करवीर, हातकणंगलेतील शेतकऱ्यांना बारामतीत प्रशिक्षण

करवीर, हातकणंगलेतील शेतकऱ्यांना बारामतीत प्रशिक्षण

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) (ATMA) कोल्हापूरच्या वतीने करवीर व हातकणंगले तालुक्यातील ६० शेतकऱ्यांना (Farmer Training) राज्यस्तरीय प्रशिक्षणांतर्गत तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये झालेल्या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना ऊस पिकातील आंतरपीक, शेततळ्यातील मत्स्यपालन, जैविक कीड नियंत्रण, पॉलिहाऊसमधील विदेशी भाजीपाला लागवड, गाई व म्हशींचा गोठा व्यवस्थापन, शेळीपालन व्यवस्थापन व कुक्कुटपालन या विषयावर तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन, बारामती येथील शास्त्रज्ञांकडून ड्रॅगन फ्रुट व आंबा पिकाच्या आधुनिक लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच कीटकांची ओळख व मत्स्य ओळख याचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणासाठी बारामती केव्हीके प्रमुख डॉ. डी. ए. शिंदे, डॉ. आर. एस. जाधव, आईसीएआरचे डॉ. राजकुमार व डॉ. रवीकुमार यांचे मार्गदर्शन झाले. आत्मा कोल्हापूरचे सुंदरम माने, निखिल कुलकर्णी व हातकणंगलेचे वासिम मुल्ला यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Renewal: परभणीत पीककर्ज नूतनीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल कमी

Rural Water Supply: मुरबाड ग्रामीण भाग टँकरमुक्तीच्या दिशेने

Agriculture Conference: माटुंग्यात हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया परिषद

Sunflower Farming: सूर्यफूल पिकाच्या शेतीने समृद्धीकडे वाटचाल

Fort Conservation: नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वासात कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT