Soybean Crop Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Farming Training : पुसाणे येथे सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Farmers Training : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत पुसाणे येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण सोमवारी (ता. २६) देण्यात आले.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत पुसाणे येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण सोमवारी (ता. २६) देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी सहायक स्मिता कानडे यांनी हे प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणात आघारकर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संतोष जायभाय म्हणाले की, ‘‘खरीप हंगामामध्ये कमी कालावधीत, कमी खर्चामध्ये, जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिलं जात.

सध्या पावसाने चांगली हजेरी लावली असल्यामुळे सोयाबीन पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या पिकाचे क्षेत्र विस्तार व उत्पादनात वाढ होण्यासाठी सोयाबीन पिकाच्या वाण निवड, बीजप्रक्रिया, पेरणी पद्धत, पेरणी अंतर, तण व खत व्यवस्थापण तसेच कीड व्यवस्थापन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ म्हणाले की, सोयाबीन पीक पेरताना ३० बाय १० सेंटिमीटर किंवा ४५ बाय १५ सें.मी अंतर ठेवून सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्याने पिकांना सूर्य प्रकाश मिळतो. हवा खेळती राहते व कीड व रोगाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे योग्य अंतर ठेवून सोयाबीन पेरणी करावी.

कृषी विभागामार्फत २५ जून ते १ जुलै हा कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत असून या संजीवनी कार्यक्रमातील आजचा दिवस हा पौष्टिक आहार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

प्रशिक्षणास कृषी पर्यवेक्षक मिनाज शेख, कृषी सहायक एम. बी. घोडके, अक्षय डूमने, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती वैशाली मिसाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन गावचे कृषी सहायक एस. एस. कानडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT