Tiger Attack Agrowon
ताज्या बातम्या

Tiger Attack : नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

मुल तालुक्यातील चिरोली परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन महिन्यांत वाघाने तीन नागरिकांचा बळी घेतल्याने शेतकरी, शेतमजुरात भीतीचे वातावरण आहे. या वाघाला जेरबंद करावे, या मागणीसाठी महिलांनी वनविभागाच्या क्षेत्रीय कार्यालयावर धडक दिली.

टीम ॲग्रोवन

चंद्रपूर : मुल तालुक्यातील चिरोली परिसरात वाघाने (Tiger Rampage) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन महिन्यांत वाघाने तीन नागरिकांचा बळी घेतल्याने शेतकरी, शेतमजुरात (Farm Labor) भीतीचे वातावरण आहे. या वाघाला जेरबंद करावे, या मागणीसाठी महिलांनी वनविभागाच्या (Forest Department) क्षेत्रीय कार्यालयावर धडक दिली.

मुल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोणबले, चिरोली ग्रामपंचायत सरपंच मीनल लेनगुरे, माजी उपसरपंच कविता सुरंगवार, ग्रामपंचायत सदस्य धीरज वाळके, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रामटेके यांच्यासह गावातील शेकडो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुल तालुक्यातील अनेक गावे ताडोबा बफरझोन क्षेत्रात येतात. बफर झोन क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होत आहे.

गेल्या दोन महिन्यांत मुलं तालुक्यातील शिरोली येथील एका शेतकऱ्याचा व कांतापेठेतील एक गुराखी व एका महिलेवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. एकापाठोपाठ एक घटना घडल्याने नागरिक वन विभागाविरोधात रोष व्यक्त करीत आहेत.

वनविभागाने याची दखल घेत वाघाला जेरबंद करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र आठ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही वाघाला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरला. त्यामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले. वाघाला तत्काळ जेरबंद करावे, जंगलाला लागून असलेल्या परिसराला तारेचे कुंपण करावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT