Nashik Leopard News Agrowon
ताज्या बातम्या

Nashik News: उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

बऱ्याच दिवसांपासून या बिबट्याचा वावर या परिसरामध्ये असून, रात्रीच्या वेळी या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पाणी भरता येत नाही.

Team Agrowon

Nashik Leopard News : येथील बहादूर शिवारात माजी सरपंच निवृत्ती मातेरे यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे तीन बछडे (Leopard Cub) आढळून आले. ऊसतोड (Sugarcane Harvesting) चालू असताना त्या उसाच्या क्षेत्रामध्ये (Sugarcane Acreage) साधारणपणे २५ ते ३० दिवसांचे. बिबट्याचे तीन बछडे ग्रामस्थांना आढळून आले.

चिंचखेड येथील वन्यजीव रक्षक किरण कांबळे, जीवन सतळे यांनी उसाच्या क्षेत्राजवळ जाऊन ग्रामस्थांना त्या बिबट्याच्या बछड्यांपासून दूर केले. त्या बछड्यांचे संरक्षण करून वनविभागाला पाचारण केले.

नाशिक वनविभागाचे (Forest Department Nashik) उप वनसंरक्षक उमेश वावरे, सहायक वनसंरक्षक संजय मोरे, दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी यांनी घटनास्थळी परिसराची व बिबट्याच्या बछड्यांची पाहणी केली.

साधारणपणे एक महिन्याचे असेल असा अंदाज उमेश वावरे यांनी सांगितले. या तीन बछड्यांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मादी बिबट्या रात्री साडेदहाच्या दरम्यान कॅमेरात कैद झाली.

या पिलांना तिने दूध पाजले आणि आपल्या तोंडात एका पिलाला घेऊन मादी त्या ठिकाणाहून आपल्या बछड्यांना घेऊन पसार झाली.

बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण

बऱ्याच दिवसांपासून या बिबट्याचा वावर या परिसरामध्ये असून, रात्रीच्या वेळी या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पाणी भरता येत नाही. असे भीतीचे वातावरण परिसरात आहे. चिंचखेडचे पोलिस पाटील सोनवणे यांच्या मेंढ्यांच्या कळपामधून भर दुपारी बारा वाजता बोर नाल्यातून मेंढरू ओढून नेऊन फडशा पाडला.

शेत शिवारात तर पाळीव कुत्र्यांना बिबट्या उचलून नेऊन शिकार करतो. विजेच्या लपंडावामुळे वेळापत्रकानुसार रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्याचे कामे करावी लागतात. त्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहे.

शेतमजूर दिवसासुद्धा काम करताना घाबरत असल्याने वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी कादवा कारखान्याचे संचालक रावसाहेब पाटील त्र्यंबकराव पाटील सुभाष मातेरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

Well Repair Subsidy: अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना मिळणार विहीर दुरुस्तीचे अनुदान

Alphanso Mango Crisis: हापूस आंब्याचा हंगाम संकटात

Gas Theft Case: गॅस चोरीप्रकरणी १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त

SCROLL FOR NEXT