Cotton Import Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Import : तीन लाख गाठी कापसाची विनाशुल्क आयात होणार

देशातील बाजारावर परिणाम होणार नाही: जाणकार

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः केंद्र सरकारने बुधवारी अध्यादेश काढून ३ लाख गाठी कापूस विनाशुल्क आयातीला (Cotton Import ) परवानगी दिली. मात्र ३ लाख गाठी हा देशातील एकूण वापराच्या एक टक्केच आहे. त्यामुळे त्याचा देशातील कापूस बाजारावर परिणाम होणार नाही, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) जाणकारांनी व्यक्त केला.
 

केंद्र सरकारने बुधवारी (ता.२८) अध्यादेश काढून ५१ हजार लाख टन कापूस शुल्काविना आयातीला परवानगी दिली. अर्थात ३ लाख गाठी कापूस शुल्कविना आयात होणार आहे. देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त असल्याचं सांगत उद्योग १०० टक्के आयातशुल्क काढण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने केवळ ३ लाख गाठी कापूस विनाशुल्क आयातीला परवानगी दिली.

 भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये झालेल्या व्यापार करारानुसार ही आयात होणार असल्याचं सांगितलं जातं. पण या कापूस आयातीचा बाजारावर परिणाम होणार नाही, असं सांगितलं जातं. कारण भारताचा वार्षिक कापूस वापर ३०० लाख गाठींचा असतो. त्यामुळं आयात होणारा कापूस हा एकूण वापराच्या एक टक्काच आहे. परिणामी याचा बाजारावर केवळ मानसिक परिणाम होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे दर नरमले होते. काल कापसाचे वायदे ८३.३२ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. क्विंटलमध्ये हा दर १५ हजार २१९ रुपये होतो. वायद्यांमध्ये कच्च्या कापसाचे नाही तर रुईचे व्यवहार होत असतात. तर आज कापूस दर चढ उतार होत सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत वायदे ८३.३३ सेंटवर पोचले होते. म्हणजेच दर कालच्या पातळीवर पोचले होते.

देशातील कापूस वायद्यांबाबत अद्यापही संभ्रम आहे. सेबीने जानेवारी २०२३ आणि त्यापुढील वायदे सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं वायदेबंदी होणार की वायद्यांना परवानगी मिळणार, यावरून सध्या चर्चा सुरु आहे.


देशातील दरपातळी

देशात आज प्रत्यक्ष खरेदी म्हणजेच बाजार समित्यांमधील कापसाचे दर स्थिर होते. चालू आठवड्यात कापासाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील कापूस आवक कमी केली होती. त्यामुळं उद्योगांना गरजेपेक्षा कमी कापूस मिळत असल्याचे प्रक्रियादारांनी सांगितले. देशातील बाजारात आज कापसाला क्विंटलला सरासरी ७ हजार ३०० ते ८ हजार ७०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान होती.

जानेवारीत दर वाढण्याचा अंदाज
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर नरमले आहेत. मात्र जानेवारीत नव वर्षाच्या सुट्ट्या संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच देशातील बाजारातील कापूस आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा बाजारात चढ-उतार, हळदीच्या दरात किंचित वाढ, वांग्याच्या भावात बदल, पालकच्या दरात सुधारणा तर लिंबाच्या आवकेत बदल

Rabi Season: रब्बीतील कृषी योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज सुरू

Dams Water Supply: चाळीसगाव, भडगावसह सहा गावांची टंचाई दूर

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?

Sangamner Farmer Protest: '१९७२ पेक्षा मोठा दुष्काळ, पाणी उचलण्यासाठी वीज नाही'; शेतकरी आक्रमक, संगमनेरमध्ये धडकला जनआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT