Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : किनाऱ्यावरील हजारो एकर भातशेती पाण्याखाली

Latest Rain Update : मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड कोसळली आहे. अन्य तालुक्यांत राजापुरात कोदवलीला, चिपळुणात वाशिष्ठी, खेडमध्ये जगबुडी, संगमेश्‍वरात शास्त्री, सोनवी, बाव नदीला पूर आला होता.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काजळी नदीच्या पुराने रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, तोणदे, पोमेंडी, सोमेश्‍वर या गावांना वेढा घातला आहे. सोमेश्‍वर गावाचा सायंकाळपर्यंत शहराशी संपर्क तुटला होता. तर किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरले होते.

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड कोसळली आहे. अन्य तालुक्यांत राजापुरात कोदवलीला, चिपळुणात वाशिष्ठी, खेडमध्ये जगबुडी, संगमेश्‍वरात शास्त्री, सोनवी, बाव नदीला पूर आला होता. नदी किनाऱ्यावरील हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १४४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगडमध्ये १५१ मिमी, दापोली १३२.४०, खेड ११५.२०, गुहागर १४३.२०, चिपळूण १३२.३०, संगमेश्‍वर १५७.७०, रत्नागिरी १७७, लांजा १६९.१०, राजापुरात ११८.१० मिमी पाऊस झाला.

मुसळधार पावसाने जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या नद्यांना पूर आला. किनारी भागातील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला. राजापुरात प्रशासनाने गुरुवारी (ता. २७) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पावसाचा सर्वाधिक फटका रत्नागिरी तालुक्याला बसला. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सहा गावांना पुराचा फटका बसला.

सोमेश्‍वर येथील किनाऱ्यारवरील अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे सोमेश्‍वरचा शहराशी संपर्क तुटला होता. गुरुवारी (ता. २७) सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर निवळी बावनदी येथे दरड कोसळली. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू केली.

नद्यांना आलेल्या पुरामुळे किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी लावणी केलेले पीकच वाहून जात आहे. संगमेश्वरातील रांगव येथील लघुपाटबंधारेच्या धरणालगत वरच्या बाजूला डोंगराला तडे गेले आहेत. चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाला धोका निर्माण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT