Crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : नांदेडमधील ‘त्या’ शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये परतावा मिळणार

Heavy Rain Crop Damage Compensation : खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्‍वासन देऊनही पीकविमा कंपनीने परतावा दिला नसल्याने शुक्रवारी (ता. २५) शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.

Team Agrowon

Nanded News : खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्‍वासन देऊनही पीकविमा कंपनीने परतावा दिला नसल्याने शुक्रवारी (ता. २५) शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाची दखल घेत कंपनीने शिल्लक शेतकऱ्यांना ता. १० सप्टेंबरपर्यंत परतावा देण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २०२२ च्या हंगामात सोयाबीन पिकाचे नुकसान होऊनही पीकविम्याचे पैसे मिळाले नव्हते. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हास्तरीय पीकविमा तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याची मागणी लावून धरली होती. जिल्हाधिकारी तथा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ता. २६ जून रोजी घेण्यात आली.

खरीप २०२२ च्या हंगामात नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा १५५ टक्के पाऊस जास्त झाला होता. परिणामी, नदीकाठ आणि सखल भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आतच पीकविमा कंपनीला कळवूनही पंचनामे करण्यासाठी पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी शेतावर आले नाहीत. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवले होते.

त्या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दाखल वैयक्तिक तक्रारीची दखल घेत तीन आठवड्यात शेतकऱ्यांच्या पीकविमा तक्रारीवर स्पष्टीकरण देण्याचे आदेश पीकविमा कंपनी प्रतिनिधीला दिले होते. परंतु विमा कंपनीकडून अद्याप परतावा मिळाला नव्हता.

यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, भारत राष्ट्र समितीच्या शेतकरी आघाडी नेते संतोष गव्हाणे, ‘स्वाभिमानी’चे हदगाव तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांच्यासह शेतकऱ्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी धरणे आंदोलन केले.

यामुळे कंपनीकडून शेतकऱ्यांना आगामी दहा सप्टेंबरपर्यंत परतावा देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याची माहिती राजेगारे यांनी दिली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, भारत राष्ट्र समितीच्या शेतकरी आघाडी नेते संतोष गव्हाणे, स्वाभिमानीचे हदगाव तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT