Takari Water Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : ‘ताकारी’चे यंदाचे पहिले आवर्तन ६ डिसेंबरपासून

ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. त्यास अनुसरून ताकारी योजनेचे यंदाचे पहिले आवर्तन ६ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

वांगी, जि. सांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे (Takari Irrigation Scheme) आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. त्यास अनुसरून ताकारी योजनेचे यंदाचे पहिले आवर्तन ६ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे ७ ऑक्टोबरला ‘ताकारी’चे पहिले आवर्तन सुरू करावे लागले होते. यंदा चांगल्या पावसामुळे नोव्हेंबर संपत आला तरी ‘ताकारी’ची गरज भासली नव्हती. त्यामुळे ‘पाटबंधारे’वरचा ताण कमी झाला आहे.

यंदा परतीचा पाऊस प्रचंड पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. परंतु भविष्यात शेतीला पाण्याची कमतरता भासून नये ‘पाटबंधारे’ने त्यादृष्टीने नियोजन करून ताकारी योजना सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

जेणेकरून सर्वत्रच टंचाई निर्माण झाल्यानंतर पाणी सोडल्यास शेतकरी आणि पाटबंधारे कर्मचाऱ्यांत होणारे वादविवाद टाळता येतील. पाटबंधारे विभागाच्या पाणी सोडण्याच्या या नियोजनामुळे रब्बी क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सोडण्यात येणारे पाणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर मिळेपर्यंत बंद होणार नाही, अशी ग्वाही अभियंता डवरी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT