Strawberry Production Agrowon
ताज्या बातम्या

Strawberry Production : स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात तीस टक्क्यांची घट

महाबळेश्‍वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना वातावरणातील बदलाचा फटका बसू लागला आहे. अचानक उष्णतेत झालेली वाढ व अपुऱ्या थंडीमुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात ३० टक्के घट झाली आहे.

विकास जाधव 

Strawberry Farming सातारा ः महाबळेश्‍वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना (Strawberry Farmer) वातावरणातील बदलाचा फटका (Climate Change) बसू लागला आहे. अचानक उष्णतेत झालेली वाढ व अपुऱ्या थंडीमुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात (Strawberry Production) ३० टक्के घट झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

स्ट्रॉबेरी हे फळ थंड हवेत येत असल्यामुळे राज्यात सर्वाधिक महाबळेश्‍वर तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड होते. या हंगामातही सरासरी इतकी म्हणजे अडीच ते तीन हजार एकर दरम्यान स्ट्रॉबेरीची लागण झाली आहे.

वन्यप्राणी तसेच काही प्रमाणात अति पावसाचा फटका स्ट्रॉबेरीस बसला. मात्र त्यावर मात करत शेतकऱ्यांनी स्ट्र्रॉबेरी आणली. हंगामही वेळेत सुरू होऊन दरही समाधानकारक मिळत असल्याने या हंगामापासून शेतकऱ्यांना आशा होत्या. मात्र ऐन हंगामाच्या भरात थंडी गायब होण्याबरोबरच उष्णतेत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

थंडी कमी होण्यामुळे फळाच्या आकार, दर्जा तसेच योग्य वेळेत काढणी यात अडचणी येत आहेत. अचानक उष्णतेत वाढ होण्यामुळे फूलगळ होणे, कमी आकारमानाची फळे पक्व होणे, फळावर डाग पडणे आदींमुळे स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पादनास फटका बसला आहे. ३० टक्के उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

दर्जेदार स्ट्रॉबेरी मिळत नसल्यामुळे चांगल्या दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. बहुतांश माल प्रक्रियेसाठी द्यावा लागत असल्याने अपेक्षित पैसे मिळत नाहीत.

उष्णता वाढीमुळे फूलगळ होत असल्यामुळे फळाविणा झाडे पोसण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास या हंगामात ५० टक्के उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.

दरात स्थिरता कायम

स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट झाली असली तरी दर मात्र टिकून आहेत. एक नंबरच्या दर्जेदार स्ट्रॉबेरीस प्रति किलोस १०० ते १३० तर दोन व तीन नंबरच्या प्रक्रियेस जाणाऱ्या स्ट्रॉबेरी प्रति किलोला ५५ ते ६५ रुपये दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वातावरणातील बदलामुळे स्ट्रॅाबेरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे फळे आकाराने लहान असतानाच पक्व होत आहेत. तसेच फुले कमी येत असल्यामुळे उत्पादनात घट होत आहे.

- रामदास महाडीक, घोटेघर, शेतकरी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा.

महाबळेश्वरमध्ये दिवसाचे ३० च्या वर तर रात्री १५ अंश सेल्सिअसच्या आत तापमान येत आहे. तसेच दुपारच्या वेळात तापमानात वाढ होत असल्याने फळाच्या रंगावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी शेडनेट तसेच शेताच्या बांधावर स्वीर्टकॅार्न मका यासारखी पिके लावणे गरजेचे आहे. शेतातील तापमान नियंत्रण कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- दर्शन कदम, सहायक प्राध्यापक, गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT