Onion  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market Rate : दर नसल्याने हताश शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर

Onion Market Update : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील शेतकरी औदुंबर बाबूराव मोरे यांनी चार एकर कांदा पिकाची लागवड केली. मात्र बाजारात दर मिळत नसल्याने हताश होऊन त्यांनी या संपूर्ण कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

Team Agrowon

Solpaur News : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील शेतकरी औदुंबर बाबूराव मोरे यांनी चार एकर कांदा पिकाची लागवड केली. मात्र बाजारात दर मिळत नसल्याने हताश होऊन त्यांनी या संपूर्ण कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

या कांद्यासाठी मोरे यांनी जवळपास दीड लाखापर्यंत खर्च केला होता. त्यांना कांद्यापासून अंदाजे तीन लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती.

परंतु लागवडीचा खर्च ही न मिळाल्याने मोठा आर्थिक फटका मोरे यांना बसला आहे. शेतकरी जगाचे पोट करण्याकरिता शेतात राबराब राबतो. तरीही शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

उत्पादित माल विकण्यासाठी जागाच उरली नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन, त्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.

कांद्याला सध्या सरासरी २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून, केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

त्यामुळे एकीकडे उत्पादकता कमी, तर दुसरीकडे केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. यंदा तरी चांगला भाव मिळेल, या आशेवर कांदा लावलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरशः पाणी आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT