Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : कांदा उत्पादकांच्या अनुदानाच्या अटींमध्ये बदल व्हावा

Onion Market Rate : शासनाने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल व दोनशे क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले आहे.

Team Agrowon

Beed Onion Market News : शासनाने कांदा उत्पादकांना (Onion Producer) प्रति क्विंटल व दोनशे क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले आहे. ते अनुदान (Onion Subsidy) शेतकऱ्यांना मिळण्यासाठी घातलेल्या दोन अटींमध्ये बदल करण्याची अपेक्षा नेकनूर येथील हेल्प इन्स्टिट्यूट फॉर नॅचरल डेव्हलपमेंट (हिंद) संस्थेने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविले असल्याची माहिती संस्थेचे सचिव संजय शिंदे यांनी दिली.

निवेदनानुसार शासनाने २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रती क्विंटल ३५० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब अभिनंदनास्पद आहे. परंतु शासन निर्णयात लेट लाल खरीप कांदा असे उल्लेखित केले आहे.

वास्तविक काही भागांत प्रामुख्याने मराठवाड्यात लेट खरिपामध्ये व त्यानंतर जास्तीत जास्त कांदा हरणा/फुरासंगी लागवड होतो. त्यामुळे मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे यामध्ये बदल होऊन लाल व इतर वाण असा उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासन निर्णयात अटीनुसार ७/१२ उताऱ्यावर पीक पाहणी नोंद असणे असा उल्लेख केलेला आहे. वास्तविक मराठवाड्यात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यानी ई-पीक पाहाणी केलेली नाही. त्यामुळे दोन्ही मुद्दे अडचणीचे आहेत.

ही बाब लक्षात घेऊन कांदा उत्पादकांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळावे यासाठी या दोन अटींमध्ये बदल व्हावा, अशी अपेक्षा ‘हिंद’ने थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्यात मेख घातलेली आहे. त्यामुळे फक्त १० ते २० टक्के शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांना थोडीफार मदत द्यायचे झाले की, नियमावलीत मेख मारणाऱ्यांना शेतकरी मायबाप कधीच दिसत नाहीत.
- संजय ज्ञानोबा शिंदे, सचिव, ‘हिंद’ संस्था नेकनूर, ता. जि. बीड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT