Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना आता दुप्पट मदत नाही

राज्य शासनाने मागील खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर ‘एनडीआरएफ’ निकषानुसार दुप्पट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.

Team Agrowon

Nanded News नांदेड : राज्य शासनाने मागील खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्यानंतर ‘एनडीआरएफ’ निकषानुसार दुप्पट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.

परंतु शासनाच्या वन व महसूल विभागाने (Revenue Department) २७ मार्च रोजी नव्याने शासन आदेश काढून हा दुप्पट मदतीचा ‘जीआर’ काढून वाढीव मदत रद्द केली आहे. यापुढे ‘एनडीआरएफ’च्या जुन्या निकषात किंचित वाढ करून पुढील तीन वर्षांसाठी मदतीचे दर निश्‍चित केले आहेत.

केंद्र शासनाच्या नेसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नेसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपद्‍ग्रस्त व्यक्तींना २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये देण्यात येणारी मदत निश्‍चित केली आहे. यात राज्य शासनाने २७ मार्च रोजी शासन आदेश काढून नेसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी दर निश्‍चित केले आहेत.

‘एनडीआरएफ’च्या जुन्या निकषानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८००, बागायतीसाठी १३५००, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० असा मदत दर होता. यात शासनाने वेळेवेळी वाढ करून शेतकऱ्यांना मदत दिली होती.

मागील वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या होत्या. तसेच अनेकांना यात जीवही गमवाला लागला होता.

या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एनडीआरएफ’च्या जुन्या दरात दुपटीने वाढ केली होती. जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८०० वरून १३६००, बागायतीसाठी १३५०० वरून २७०००, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० वरून ३६००० असा दर वाढून मदत जाहीर केली होती.

परंतु शासनाच्या वन व महसूल विभागाने २७ मार्च रोजी नव्याने शासन आदेश जारी केला. यात दुप्पट मदतीचा जीआर रद्द केला आहे. यापुढे ‘एनडीआरएफ’च्या जुन्या निकषात किंचित वाढ करून पुढील तीन वर्षांसाठी मदतीचे दर निश्‍चित केले आहेत. यात जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ८५००, बागायतीसाठी १७००० तर बहुवार्षिक फळपिकांसाठी २२५०० दर निश्‍चित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT