Parbhani News  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Digital Technology : शेतीमधील डिजिटल तंत्रज्ञानाची उपयुक्तता वाढणार

Agriculture Technology : हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारे नकारात्मक परिणाम, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, आरोग्यदायी अन्न निर्मिती, पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानावर संशोधन सुरु आहे.

Team Agrowon

Parbhani News : हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारे नकारात्मक परिणाम, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, आरोग्यदायी अन्न निर्मिती, पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानावर संशोधन सुरु आहे. बदलत्या हवामान स्थितीत शेतीमधील डिजिटल तंत्रज्ञानाची उपयुक्तता वाढणार आहे.

त्यादृष्टीने कनेक्टिकट विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार केला जाईल असे प्रतिपादन अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक प्रा. इंद्रजित चौबे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन तसेच मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष, आंतरराष्‍ट्रीय भरडधान्‍य वर्ष यानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग यांच्‍यातर्फे गुरुवारी (ता. १८) आयोजित खरीप पीक परिसंवादाचे उद्‍घाटन प्रसंगी डॉ. चौबे बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. अहमदाबाद येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष गोपालभाई सुतारीया, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र हरणे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रगतिशील शेतकरी नरेश शिंदे, जनार्दन आवरंगड, मंचक सोळंके, सरिता बाराहाते आदीची उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की विद्यापीठाच्या कार्याचे शेतकरी आणि विद्यार्थ्यी हे केंद्रबिंदू आहेत. मानवी संस्कृती पुढे अन्न सुरक्षितता, जल सुरक्षितता, ऊर्जा सुरक्षितता, हवामान बदल ही आव्हाने निर्माण झाली आहेत.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. शेतकऱ्यांना येत्या काळात डिजिटल शेतीचे तंत्रज्ञान अवगत करावे लागेल. ऊर्जा समस्येवर मात करण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये सौर ऊर्जा वापराचे मॉडेल तयार केले जाईल.

सुतारिया म्हणाले, की गोआधारित सेंद्रिय शेती पद्धतीमुळे उत्पादनात घट येत नाही. प्राचीन आणि आधुनिक ज्ञानाची सांगड घालून शेती करावी लागेल. डॉ. देवसरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वीणा भालेराव व डॉ. सुनीता पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. देशमुख यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT