Watermelon Agrowon
ताज्या बातम्या

Watermelon Theft : पद्मश्री रवींद्र कोल्हे यांच्या शेतातून कलिंगडांची चोरी

पदमश्री रवींद्र कोल्हे यांच्या शेतातून दहा क्‍विंटल कलिंगडांची चोरी झाल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

Team Agrowon

Amravati News : पदमश्री रवींद्र कोल्हे (Padmshri Ravindra Kolhe) यांच्या शेतातून दहा क्‍विंटल कलिंगडांची चोरी (Watermelon Theft) झाल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पुराव्यासहित तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कोल्हे यांनी केला.

दीड ते दोन लाख रुपयांचे शेतीमाल चोरी झाल्यानंतरही पोलिसांनी केवळ २० हजार रुपयांचाच मुद्देमाल तक्रारीत दर्शविला आहे, अशी नाराजी कोल्हे यांनी व्यक्त केली.

आदिवासींच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्यांमध्ये डॉ. रवींद्र कोल्हे यांचा समावेश होतो. धारणी तालुक्‍यातील दुर्गम कोलपूर भागात ते राहतात. त्यांचा मुलगा रोहित हा अन्य ठिकाणी शेती करतो. तर डॉ. कोल्हे हे कोलूपूर तसेच नव्याने घेतलेल्या बोड शिवारातील शेतीचे व्यवस्थापन करतात.

या शिवारात त्यांनी पावणेपाच एकरावर कलिंगडांची लागवड केली होती. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेतातून कलिंगडाची चोरी होत होती. शेताची राखण करण्यासाठी असलेला व्यक्‍ती काही कामासाठी बाहेर गेला की ही चोरी होत होती. त्यामुळे त्यांनी चोरट्यांवर लक्ष्य ठेवण्यास लगतच्या शिवारातील शेतकऱ्यांना सांगितले होते.

दरम्यान, सोमवारी (ता.८) दुपारी एका बोलेरो वाहनात कलिंगड तोडून भरले जात असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांना मिळाली. त्यानंतर त्यांचा मुलगा रोहित घटनास्थळी पोचला. यावेळी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर वाहन व एका व्यक्‍तीचे मोबाईल व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.

दहा क्‍विंटल कलिंगड एकाचदिवशी तोडण्यात आले होते. यापूर्वी देखील शेतातून फळांची अनेकदा चोरी झाली. त्यामुळे दीड ते दोन लाख रुपयांची चोरी असताना पोलिसांनी केवळ २० हजार रुपयांची नोंद घेतली.

० पीव्हीसी पाइप, ५० ते ५५ फूट वीजवाहक केबल, स्प्रींकलर देखील यापूर्वी या शेतातून लंपास करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार न नोंदविता आपसांत मिटवून घेण्यासाठी दबाव टाकला. मात्र वरिष्ठांना ही बाब सांगणार असे म्हटल्यानंतर थातुरमातूर तक्रार नोंदविली.

- डॉ. रवींद्र कोल्हे, कोलूपूर, ता. धारणी, जि. अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT