Team Agrowon
खानदेशात कलिंगडाचे दरात किलोमागे एक रुपयांची सुधारणा झाली आहे.
सध्या शिवार खरेदीत कलिंगडाला प्रतिकिलो साडेनऊ रुपायांचा दर मिळत आहे.
खानदेशात दिवसाला ३० ट्रक (प्रतिट्रक १६ टन क्षमता) कलिंगडाची आवक होत आहे.
खानदेशात दिवसाला ३० ट्रक (प्रतिट्रक १६ टन क्षमता) कलिंगडाची आवक होत आहे.
यंदाच्या हंगामात खानदेशात कलिंगडाची लागवड दुपटीने वाढली आहे.
मागणी कमी असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस दर जाग्यावर प्रतिकिलो पाच ते साडेपाच रुपये होते.
मात्र, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा होवून दर प्रतिकिलो नऊ रुपायांवर पोहोचले.
सध्या दर्जेदार कलिंगडास जागेवर साडेनऊ रुपये तर कमी दर्जाच्या कलिंगडाला जागेवर सहा ते साडेसहा रुपये प्रतिकिलोचा दर आहे.