Summer Heat Agrowon
ताज्या बातम्या

Heat Like Summer : खानदेशात तापमान वाढू लागले

Temperature : पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापमान तयार होत आहे. मागील दोन दिवस कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापमान तयार होत आहे. मागील दोन दिवस कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मागील तीन - चार दिवसांपासून सकाळी दहापासूनच उन्हाचे असह्य चटके सुरू झाले होते.

त्यात वीजपुरवठा बंद झाल्याने अधिकच उकाडा जाणवू लागला आहे. येत्या ४ सप्टेंबरपर्यंत तापमानात वाढ होऊन ते ३५ अंशांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. कारण पाऊस कमी आहे. काही भागांत पिके हातची गेली आहेत.

केळी, कापूस उत्पादकांनी सिंचनासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. केळीला मागील तीन दिवस रोज दोन तास पाणी दिले जात आहे. मध्यम, हलक्या जमिनीतही कृत्रीम जलसाठाधारक शेतकऱ्यांनी कापसाला एक ते दीड तास सिंचन केले आहे. दुपारी १२ ते चार या काळात चटके अधिक असतात.

यंदा जूनमध्ये पाऊस नव्हता. २५ जून रोजी काही भागांत पाऊस झाला. ६ जुलै रोजी खानदेशात अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला. पेरण्या केल्या. जुलैमध्ये पाऊसमान बरे होते. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. धुळ्यात ५२ टक्के आणि नंदुरबारातही सुमारे ५५ टक्के पाऊस झाला आहे.

६ ऑगस्टपासून पाऊस कमी आहे. काही भागांत पाऊसच नाही. मध्यंतरी दोन- तीन वेळा जोरदार पाऊस झाला. मात्र तो काही तासांपुरताच राहिला. ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. कुठल्याही वेळेस वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे अडचणी वाढत आहेत.

पिकांना प्रतीक्षा

पावसाच्या ओढीने खरिप पिकांना मोठा फटका बसला आहे. जमिनीत भेगा पडून पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे. हा महिना खरीप पिकांना शेंगा, फुले येऊन पिके परिपक्व होण्याचा आहे. असे असताना एक ते दीड फूटच पिकांची वाढ झाली आहे. शेतकरी केव्हा पाऊस येईल यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT